Tuesday, September 20, 2022

 तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकलाय ना किमान आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकलंय ना ? मग मराठी चित्रपटांना ऑडियन्स नाही म्हणून बोंब काय मारता ? केवळ तुमचे पिक्चर्स चालावेत म्हणून अंगवळणी पडलेल्या इंग्लिशचा इंग्लिश हिंदी चित्रपट पाहण्याच्या सवयीचा त्यांनी त्याग करावा का ?

श्रीधर तिळवे नाईक 

मी अडाणी मनुष्य असल्याने पाच  प्रकाराने मराठी चित्रपट पाहतो 

१ प्रायोगिक(हे मराठीत जवळजवळ नाहीतच ) वा समांतर मराठी चित्रपट म्हणजे न्यूड जैत रे जैत सिंहासन फॅन्ड्री 
२ यशस्वी व्यावसायिक चित्रपट ज्यांनी उत्तम गल्ला जमवलाय म्हणजे सैराट , टाईमपास १ , पिंजरा , सुशीला , झुंज 
३ यशस्वी धंदेवाईक चित्रपट दादा कोंडके , महेश कोठारे , सचिन , संजय जाधव ह्या सारख्या दिग्दर्शकांचे किंवा काहीवेळा टेक्निकल रिझनसाठी उदा  भानू अथैयाच्य कॉस्च्युम्सठी आर्ट डिरेक्शनसाठी उदा नितीन चंद्रकांत देसाई  अपवादात्मकवेळा अभिनयासाठी उदा लक्ष्या व अशोकसाठी अशी ही बनवाबनवी किंवा उषा चव्हाणचे काय ग सखू बोला दाजीबा 
४ मला चित्रपटापेक्षा संगीत आणि कोरियोग्राफी जास्त आवडते अत्यंत फालतू गाणीही मी चार पाच वेळा ऐकली आहेत चांगली गाणी असतील तर किमान दहादा पिंजरा , झुंज , सुशीला , सैराट , टाईमपास सारखी मेजवानी असेल तर शेकडोवेळा अलीकडे एखादे गाणेच चांगले असते ते मी खूपदा पाहतो ऐकतो राम कदम , हृदयनाथ मंगेशकर व अजय अतुलचे अनेक चित्रपट केवळ त्यांच्या संगीतासाठी मी सहन केले आहेत 
५ मैत्री ही माझ्यासाठी महत्वाची असल्याने माझ्या मित्रांचे चित्रपट पाहण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो म्हणजे किशोर कदम , अभिराम भडकमकर , मनोज जोशी ,राकेश सारंग  ह्यासारख्या माझ्या मित्रांचे चित्रपट मी प्रथम ते मित्र आहेत म्हणून पाहतो 

मी मराठी लोकांना , संस्कृतीला , माध्यमांना कचकचीत शिव्या घालतो आणि मराठी चित्रपट आणि चॅनेल्स पाहतो आपल्या लोकांना शिव्या घालायच्या नाही तर कुणाला घालायच्या असा माझा कोल्हापुरी बाणा आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

No comments:

Post a Comment