Tuesday, August 20, 2019

खय्यामना आमच्या पिढीने ऐकले ते कभी कभी त्रिशूल पासून ते एव्हढे क्लासी संगीतकार आहेत ह्याची आम्हाला कल्पनाच न्हवती त्यांचं तोंडात बसलेलं पहिलं गाणं गापूची गापूची गम गम हे त्रिशूल मधलं लहानपणासाठी असली गाणी परफेक्ट !  पुढे संगीताची अधिक अक्कल आली आणि डान्ससाठी सोकावलेलं माझं शरीर डान्सिकल गाण्याव्यतिरिक्त मेलडीही ऐकायला लागले पुढे लक्ष्यात आले कि खय्यामसाहेबांची क्लासिकल इमेज इतकी त्यांच्या फॅन्सनी मोठी केलीये कि गापूची व तेरे चेहरेसे व मौसम मौसम लव्हली मौसम(थोडीसी बेवफाई ) सारखी गाणी चक्क कानाआड केली जातायत

लता मंगेशकरांनी त्यांचे सर्वात बेस्ट गाणे म्हणून रझिया सुलतान मधले ए दिले नादान निवडले तेव्हा थोडा धक्का बसला होता पण नंतर कळले कि बाई अधूनमधून घोषणा करत असतात मात्र हे एक अफलातून गाणे होते एव्हढे निश्चित

बाजार आणि उमराव जान कळस होते एका अर्थाने आमच्या पिढीने त्यांचा बेस्ट फॉर्म बघितला

त्याआधीची त्यांची "हे कली कली के लंबपर " " बहारो मेरा जीवनभी संवारो "  " श्यामे गमकी कसम "  "तू ही सागर तूही किनारा( हे सुलक्षणा पंडितने पंडितने गायलेले गाणे तिला फिल्मफेयर देऊन गेले होते )" ही माधुर्याने भरलेली गाणी कानांना खिळवून ठेवणारी होती

गीतांच्या बोलाबाबत ते गीतात काव्य असण्याबद्दल सजग होते आणि त्यामुळेच बावरी चा अपवाद वगळता आनंद बक्षीच्या वाट्याला ते फारसे गेले नाहीत गुणवत्तेचा आग्रह हा तुम्ही जर यशस्वीही झालात तर ऐकून घेतला जातो जसा कि तो नौशादबाबत ऐकून घेतला गेला खय्यामच्या नशिबाने ह्याबाबत १९८५ नंतर पुन्हा पलटी मारायला सुरवात केली आणि एकापाठोपाठ एक फिल्म्स फ्लॉप व्हायला लागल्या हिट है तो फिट है ह्या चालीने चालणाऱ्या बॉलिवूडमध्ये हे परवडणारे न्हवते त्यातच नंतर बप्पी लाहिरीच्या हिम्मतवालाने संगीताचा बाज पूर्णच बदलला आम्ही लोक आता तरुण झालो होतो आणि आम्हाला फक्त नाचायचं होतं ऐकायचं न्हवतंच बाप्पीची गाणी नाचायला लय भारी असल्याने आम्ही ता थय्या ता थय्या करत बसलो आम्ही खय्याम फेकूनच दिला खरंतर आणि त्यातच त्यांच्या फिल्म्स वाईट होत्या आता संगीतासाठी फिल्म्स बघण्याचा जमाना संपला होता कारण कॅसेट्स आल्या होत्या खय्यामसाठी वाईट फिल्मा बघण्यापेक्षा त्यांचं संगीत कॅसेटवर ऐकणे आमच्या फाटक्या खिशाला परवडेबल होतं नदीम श्रवणमुळे मेलडी परत आली तरी ही मेलडी अभिजात न्हवती तिच्यात एक कामचलाऊपणा होता खय्याम अभिजात होते त्यामुळे फिट्ट होईनात बरं १९८७ नंतरची गाणी आधीच्या दर्जाला मॅच होणारी न्हवती शिवाय नदीम श्रवण संगीतात एक तरी गाणे डान्ससाठी बनवायचे म्हणजे साजण मध्ये देखा हैं पहली बार साजणकी आँखोंमे प्यार हे डान्सिकल होतेच खय्याम असे गाणे देऊ शकत नाहीत अशी त्यांची व इतरांची पण समजूत होती वास्तविक ते डान्सिकल गाणी देऊ शकले असते पण त्यासाठी यश चोप्रासारखा डिरेक्टर असणे आवश्यक होते आणि खय्यामच्या नशिबी तेच न्हवते खय्यामच्या ५० टक्के हिट फिल्म्स यश चोप्रा कॅम्पशी निगडित आहेत ते त्यामुळेच ! अभिजातला सामावून घेण्यासाठी अभिजात दिग्दर्शक लागतात आणि इंडस्ट्रीत स्टारडम फॅशनमुळे त्याचाच अभाव आहे खय्यामना ह्याचा फटका बसला

खय्याम नौशाद स्कूलचे असले तरी त्यांनी पूर्णपणे आपला स्वतंत्र ठसा उमटवला त्यांचा जसा वापर करून घ्यायला हवा होता तसा झाला नाही भारतातील सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे इथे पॉप संगीत हे कायमच चित्रपटसंगीताशी जोडले जाते मग गायनाशी परिणामी जोवर एखादा संगीतकार चित्रपटात यशस्वी होत नाही तोवर त्याला मान्यता मिळणे कठीण जाते एकंदरच सगळ्या गोष्टीची खिचडी करण्याचा आपला स्वभाव संगीतालाही लागू होतो

खय्याम गेले आणि आता अभिजात मेलडीचे काय असा प्रश्नच निर्माण झालाय ओ पी नय्यर हृदयनाथ मंगेशकर जयदेव आणि खय्याम ह्यांनी मेलडीला जे माधुर्य दिले ते अवर्णनीय आहे ते कायमच आपल्यासोबत राहील प्रश्न हाच आहे कि २१ व्या शतकात ह्या मेलडीयस माधुर्याचं काय होणार आहे ?

श्रीधर तिळवे नाईक


Friday, July 5, 2019

Tuesday, March 7, 2017

धंदेवाईक , प्रायोगिक , समांतर आणि प्रायोगिक श्रीधर तिळवे नाईक 

कुठलीही कला (चित्रपट) संस्कृती यशस्वी होण्यासाठी तिच्यात
१ धंदेवाईक
२ व्यावसायिक
३ समांतर आणि
४ प्रायोगिक कलाकृती येत राहणे गरजेचं असतं ह्यातील प्रायोगिकला लोकप्रियता मिळाली नाही तरी किमान स्वागतता मिळणे फार गरजेचे  ते झालं नाही कि प्रायोगिकता खुंटायला लागते

जे व्यावसायिक प्रोफेशनल आहे त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते जेणेकरून अशा कलाकृतीत घातलेला पैसा वसूल होऊन त्यातून थोडाफार फायदा मिळेल

जे धंदेवाईक कमर्शियल आहे त्याला मात्र नुसती मान्यता मिळून चालत नाही तर प्रचंड लोकप्रियता मिळणे गरजेचे असते त्याशिवाय घातलेला पैसा जो कधी कधी प्रचंड असतो वसूल होत नाही साहजिकच मार्केट आणि ग्राहक ह्या दोन्ही गोष्टी इथे आवश्यक असतात

चित्रपट ह्याला अपवाद नसतात चित्रपटात पैश्याची गणितं फार मोठी होत जातात त्यामुळे प्रायोगिक चित्रपट हा जवळ जवळ अशक्य बनत जातो पैशे बरबाद करण्याची क्षमता असलेला निर्माता मिळाला तरच प्रायोगिक चित्रपट घडू शकतो न्यू वेव सिनेमानंतर चित्रपटात प्रायोगिक चित्रपटाची लाट कधी आल्याचे निदान मला तरी आठवत नाही . जे काही सध्या प्रायोगिक म्हणून येतंय ते प्रत्यक्षात बहुतांशी समांतर आहे समांतर कलाकृती हमखास स्वागतता कमावतात म्हणून नवीन लोक मोठ्या हुशारीने समांतर चित्रपट बनवतात कारण त्यांना समांतर चित्रपट हे मान्यतेकडे न्हेण्याची शिडी आहे हे नीट माहित असते ह्यातील अनेकांना प्रायोगिकतेशी काहीही देणेघेणे नसते व्यावसायिक होता येत नाही म्हणून प्रायोगिक अशीही काही जणांची स्ट्रॅटेजी असते आर्ट सिनेमाच्या नावाने हे खपूही शकते काही मात्र खूपच सिरीयस असतात जे प्रायोगिक झालेले आहे ते त्यांना फार महत्वाचे वाटत असते त्यांना त्या प्रायोगिकतेला पुढे न्ह्यायचे असते किंवा संपन्न करायचे असतात उदाहरणार्थ डॉल्स हाऊस ह्या प्रायोगिक नाटकाचे अनंत काणेकर लिखित घरकुल हे समांतर रूपांतर

अनेकदा समांतर रूप व्यावसायिक दृष्ट्या प्रस्तुत करता येईल असेही वाटू शकते मग व्यावसायिक पातळीवर आचार्य अत्रे डॉल हाऊसचे  व्यावसायिक रूपांतर करून ते घराबाहेर ह्या नावाने सादर करतात त्यासाठी काही आक्षेपार्ह बदल घडवतात आणि मूळ प्रायोगिकतेचा पाया विसविशीत करतात

चित्रपट कलेच्या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे कुठला देश स्वतःची म्हणून कुठली मुख्य शैली निवडतो ?फ्रान्सच्या बाबत ही शैली प्रामुख्याने प्रायोगिक व समांतर असल्याचे दिसते तर यूएसए विशेषतः हॉलिवूड व्यावसायिक शैली प्रधान शैली म्हणून निवडतो भारत विशेषतः बॉलिवूड मात्र धंदेवाईक शैली स्वतःची मुख्य शैली  म्हणून निवडतांना दिसतो साहजिकच बुद्धिवंतांच्यामध्ये बॉलिवूडबद्दल एक आंतरिक असमाधान आढळते
१९९९ नंतर मात्र हळहळू व्यावसायिक शैली हीही प्रधान शैली म्हणून विकसित होतांना दिसते विशेषतः बायोपिक्स आणि बायोसिन्स ह्यांच्या आधारे आलेल्या भाग मिल्खा भाग मेरीकॉम  वा तलवार सारख्या चित्रपटांनी ही व्यावसायिक शैली हिट होण्याची गॅरंटी निर्माण केली ज्याचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर होऊन मराठीतही लोकमान्य बालगंधर्वसारखे व्यावसायिक बायोपिक निर्माण झाल्याचे दिसते

फिक्शनमध्ये दिल चाहता हैं लगान मुन्नाभाई एम बी बी एस सारख्या चित्रपटांनी व्यावसायिक शैलीही यशस्वी होऊ शकते हे पुन्हा एकदा लक्षात आणून दिले वास्तविक व्ही शांताराम हे ह्या शैलीचे मुख्य पायोनियर त्यांचे माणूस , दो आँखे बारह हाथ , डॉ कोटणिसकी अमर कहाणी ( हा भारतातील पहिला व्यावसायिक बायोपिक चित्रपट ) ह्यांनी हा पायंडा पाडला होता पुढे प्यासा , आवारा , जोगन , नया दौर ह्या सारख्या चित्रपटांनी तो पुढे न्हेला होता पण नंतर उत्कृष्ट संगीत आणि रोमान्स ह्यांच्या धंदेवाईक मिश्रणाने ह्या पायाला उद्धवस्त केले सलीम जावेदनी सोशल ऍनगरही धंदेवाईक करून दाखवला आणि त्यामुळे सोशल कमिटमेण्टही बाजारू गोष्ट बनली हळूहळू ह्या कढीला शिळेपणा प्राप्त झाला आणि त्यातूनच पुन्हा एकदा व्यावसायिकतेची वाट निर्माण झाली प्रश्न असा आहे कि ह्यापुढे हॉलीवूडसारखी आपलीही प्रधान शैली हीच व्यावसायिक शैली होणार कि दबंग सारखे धंदेवाईक चित्रपट धंदेवाइकतेचा नवा पायंडा पाडणार ?

माझ्या मते १९५७ नंतर हळूहळू व्यावसायिक हटत गेला तसे होणार नाही ह्यापुढे बॉलिवूड धंदेवाईक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट निर्माण करत राहील दिल चाहता हैं आणि मेरीकॉम  सारखे चित्रपटही येत राहतील आणि दबंग सारखेही !

ह्यात प्रश्न असा निर्माण होतो कि ह्यात प्रायोगिक आणि समांतरचे काय ? तर ह्यांचे कठीण दिवस पुढेही चालू राहतील हेच त्याचे प्रामाणिक उत्तर आहे .

श्रीधर तिळवे नाईक








Friday, October 21, 2016

निसर्गवाद , वास्तववाद , देशीवाद   आणि दृकप्रत्ययवाद ह्यांच्यावर पांच प्ले ऍनालिसिस वर तीन आणि ग्रीक शोकांतिकेवर दोन अशी दीड तासांची दहा व्याख्याने देतांना मजा आली . ह्यावेळीही प्रतिसाद जबराट होता . मागच्याप्रमाणे ह्याहीवेळी काही  दीड तासाची व्याख्याने दोन तासांवर गेली . शिवाय संगीताचे काम त्यामुळे गेले पांच दिवस वीस तास काम आणि चार तास झोप असा प्रकार चालू होता नवीन पिढीचा आय क्यू आमच्या पिढीपेक्षा अधिक उजवा आहे . त्यामुळे शंका अनेक !फ्रेंच विद्यार्थिनीला प्लेटो ,ऍरिस्टॉटल , देरिदा शिकवणे हाही एक अनुभव कारण शंका थेट युरोपिअन परंपरेतून आलेल्या !आता दोन दिवस विश्रांती घ्यावी म्हणतोय .



Sunday, September 25, 2016

संध्या सोमण  आणि सतीश तांबे ह्यांच्या पोस्टमुळे लिहावी लागलेली पोस्ट

सध्याच्या काळात स्पर्श प्राथमिक असण्याची गरजच संपलीये . तुमच्याकडे भाषा आहे आणि स्पर्शाआधी तुम्ही त्या स्त्रीला वा पुरुषाला  विचारू शकता मेसेज पाठवू शकता .  ती व्यक्ती नाही म्हंटली तर स्पर्श टाळणेच योग्य . सार्वजनिक ठिकाणी वा सभारंभात अनोळख्या व्यक्तीच्या  मिठीकडे जाण्यापेक्षा हॅन्डशेक योग्य . जिची ओळख आहे तिच्याबाबत  संध्याजीनी उपस्थित केलेला स्पर्शप्रश्न उपस्थित होणे थोडे अशक्य आहे . ओळख असूनही तिचा मूड तुम्हाला कळत नसेल तर ओळख '' ओळख '' न्हवे . आणि स्पर्शासाठी ओळख असेल तर प्रथम भाषाच वापरणे योग्य . 

Friday, February 12, 2016

UNIVERSITY OF MUMBAI

Was busy in delivering lectures in UNIVERSITY OF MUMBAI for MASTER OF THEATRE ARTS on
1 NET OF PLAY
2 THEORY OF ACTING
3 HOW TO INTERPRET PLAY
4 SIGMUND FREUD AND SYMBOLIC THEATRE
5 EXISTENTIALISM AND ABSURD THEATRE

Thursday, December 10, 2015

SHRIDHAR TILVE (WRITER-DIRECTOR)
Born in Kohlapur. Shridhar Shantaraam Tilve, is an M.A (first class first) in Literature, and Fellowship Holder for 5 years in Visual Arts.
During his 5 years of Visual Arts research, he gained an in-depth knowledge of Film making .
He had started his Directorial journey with the Direction of several successful local Commercial Ads, and Documentaries.
In 2008 he Wrote his first Feature Film in Marathi named 'JOSHI KI KAMBLE' which went on to be a commercial success and won many Awards.  Directing Hindi feature film.
 FILM AWARDS:-
- ZEE GAURAV AWARD - BEST STORY for 'JOSHI KI KAMBLE'
- MAHARASHTRA TIMES AWARDS - BEST STORY ,
                                                                SCREENPLAY, DIALOGUES
                                                             'JOSHI KI KAMBLE
OTHER HONORS:-
- The Prestigious KESHAVSUT AWARD as a Best young writer by Govt. of Maharashtra.
- SAHAKARMAHARSHI VANGMAY PURASKAAR as a young talent along with Vijay Tendulkar (celebrated writer).
Shri. Shridhar Tilve has also contributed immensely to Hindi and Marathi literature by writing several plays, poems and novels.
PLAYS:-
-eka mhataryacha khoon (acted )
- Ek tha Kach(writer)
-udahernarth mrutyu waigare(writer,director ,actor)
- Satiechya Savalya(writer)
- Arth, Vayarth ani Nirath(writer director and music director)

PUBLISHED WORK
NOVELS:-
- A DA HAW KA BA NA SU NA

- ATMACHARITABLE KALPNIK KSHAN
STORY COLLECTION:-
-AMERIKECHE ADHYAKSHA ALE TEVHACHI GOSHT
POETRY COLLECTIONS:-
KA VI
CHANNEL:DESTROYERY
STREEVAHINI
EKA BHARTIYA VIDYARTHACHE UDGAR
CHANNEL:UNDER THE WORLD
DECATHLON
DECATHLON:REAL
DECATHLON:SURREAL
DECATHLON:TRANSCEREAL
PHILOSOPHY AND AESTHETICS OF ART       
-TEEKAHARAN
-CHAUTHI  NAVTA
FILM SCRIPT
JOSHI KI KAMBLE